भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व्दारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव डॉ कार्तिक शिंदे, प्रमुख अतिथी संस्थेचे विश्वस्त डॉ जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ सुधीर मोते व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ कार्तिक शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर प्रकाश टाकला व त्यांचा आदर्श अंगीकारणाचे आवाहन केले. तसेच प्रमुख अतिथी डॉ जयंत वानखेडे यांनी मार्गदर्शन करताना शिवाजी महाराज हे द्रष्टा राजे होते, त्यांनी सर्वच क्षेत्रात कार्य केले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या प्रसंगी प्रा. भिष्माचार्य बोरकुटे, सतीश नंदनवार, प्रा. उज्वला वानखेडे मॅडम, सैयद मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण मत्ते यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय लांबट यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






