spot_img
spot_img
29.9 C
New York
Friday, July 31, 2026

भद्रावती येथील वनिता घुमे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने दिला पुरस्कार

भद्रावती : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सन २०१३-१४ चा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार १ मे महाराष्ट्र दिनी भद्रावती येथील वनिता गजानन घुमे यांना प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपूर येथील ध्वजारोहण च्या मुख्य समारंभात वने व सांस्कृतिक मंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते आमदार सुधाकरराव अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जांसन, पोलीस अधीक्षक परदेशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांचे प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वनिता घुमे यांचे महिला व बाल विकास क्षेत्रातील कार्य भद्रावती तालुक्यातील बेलगाव (भु) येथून उत्कर्ष पुरोगामी महिला व बाल कल्याण संस्थेच्या माध्यमातून मागील वीस वर्षांपूर्वी सुरू झाले ते आजतागायत संचालक व समुपदेशक महिला समुपदेशन केंद्र, भद्रावती, जिल्हा समन्वयक राज्य महिला आयोग, स्थानिक महिला तक्रार समिती, सदस्य बालकल्याण समिती चंद्रपूर, तज्ञ मार्गदर्शक/प्रशिक्षक,विविध सामाजिक संघटन अशा विविध पदांवर राहून पिडीत महिला व बालकांकरिता तळमळीने सेवा करीत आहेत.या कार्याची दखल शासनाने घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करून सन्मानित केले. याबद्दल त्यांचे विविध संस्था व संघटना, लोकप्रतिनिधी व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!