spot_img
spot_img
21.8 C
New York
Thursday, July 30, 2026

अवकाळी पावसाचे पाणी साचल्याने रस्ता जलमय

रस्त्याने जाणारे वाहनधारक व पायदळ नागरिक त्रस्त

भद्रावती : गुरुनगर ठेंगे प्लॉट येथील वृंदावन सहभागृहा जवळील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील नाल्यांच्या उंच बांधकामाने रस्ता खाली गेला. त्या नाल्यात पावसाचे पाणी वाहून जाऊ शकत नसल्याने ते रस्त्यावर साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या आशयाचे निवेदन तेथील नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व नगरध्यक्ष यांना दिले.

नगरपरिषदेने नगरपालिका वैशिष्ट्यपूर्ण फंडातून पाच महिन्यापूर्वी गुरुनगर ठेंगे प्लांट मधील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्यांचे बांधकाम केले. सांडपाणी योग्यरीत्या वाहून जाण्याकरिता त्या रस्त्यापेक्षा उंच बांधण्यात आल्या. आता तो रस्ता नाली बरोबर उंच करणे गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याकरिता जागा नसल्याने ते रस्त्यावर तुंबून रहदारीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे वाहनधारक आणि पायदळ नागरिक त्रस्त झालेत.

गुरु नगरच्या नागरिकांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विशाखा शेळकी आणि नगराध्यक्ष अनिल धानोकर यांना निवेदन दिले. आपली समस्या लवकरच निघाली काढल्या जाईल असे आश्वासन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी दिले. निवेदन करत्यात गोलू उर्फ योगेश ठेंगे, पुरुषोत्तम नैताम, आशीष देहारकर, प्रकाश ठेंगे, प्रदीप बैठा, कैलास लांडगे ,भुमेश्वर क्षिरसागर आणि इतरांचा समावेश होता.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!