spot_img
spot_img
29 C
New York
Friday, July 31, 2026

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्य ऐतिहासिक बुद्ध लेणी येथे शिस्तबद्ध मानवंदना

भद्रावती : परिसरातील ऐतिहासिक धरोहर म्हणजे विज्जासन येथील बुद्ध लेणी. वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणुन सुद्धा ओळखल्या जाते. ह्या निमित्ताने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा स्थापित समता सैनिक दल, शहर तथा तालुका शाखा भद्रावती तर्फे सकाळी ९:०० वाजता तथागत गौतम बुद्धांना शिस्तबद्ध आदरपुर्वक मानवंदना देण्यात आली.

मानवंदने साठी समता सैनिक दलाचे अविनाश दिग्विजय, मार्शल कमलाकर काटकर, मार्शल अशोक पाझारे उपस्थित होते. लेणी परीसरात संपुर्ण बुद्ध वंदना घेण्यात आली. बुद्ध वंदना एका सुरात आणि लयबद्ध पद्धतिने घेण्यात आली. हेच ह्या मानवंदनेचे मुख्य आकर्षण ठरले. संपुर्ण परिसर वंदनेच्या सुराने प्रफुल्लित झाला. त्यानंतर समता सैनिक दलाचे शहर संघटक मनिकुमार जाधव ह्यांनी उपस्थितांना मौलीक असे मार्गदर्शन केले. मानवंदनेचे कमांडिंग मार्शल हर्षल रामटेके ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन मार्शल गणेश शिरुड यांनी केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!