शहरातून निघणार भव्य शोभायात्रा…
भद्रावती
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे आयोजन भद्रावती येथील संताजी स्नेही मंडळ तर्फे करण्यात आले आहे. दिनांक एक व दोन फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
सर्वप्रथम दि.१ फेब्रुवारी शनिवारी घटस्थापना आणि मूर्ती पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. तसेच महिलांसाठी हळदी कुंकू, गृहमंत्री कार्यक्रम आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक २ फेब्रुवारी ला संताजी जगनाडे महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ सुधीर मोते यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मुख्य मार्गदर्शन कार्यक्रम दुपारी चार वाजता संताजी सभागृह संताजी नगर येथे होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टुडन्ट राईट फेडरेशनचे अध्यक्ष उमेश कोराम, उद्घाटक सुमेध खनके, पोलीस स्टेशन अधिकारी अमोल काचोरे, प्रमुख पाहुणे चंद्रपूरचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ प्रदीप वरघने व विवेक पाहणे, प्रशांत सूरकर, कवयित्री व लेखिका सौ. केशनी हटवार, ज्योती गायकवाड आणि वर्षा तराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
संताजी स्नेही मंडळाच्या वतीने भद्रावती तहसील मधील सर्व समाज बांधवांना या दोन दिवसीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.






