भंडारा
विद्यार्थ्यांनो, माता, मातृभाषा आणि मायभूमी यांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. तेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे समृद्धीकरण करणे व त्यासोबतच जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्हाला शालेय अभ्यासाव्यतिरिक्त इतरही स्पर्धा कार्यक्रमात भाग घेणे आवश्यक आहे. मराठी ही आपली मातृभाषा असून त्याद्वारे मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे. असे प्रतिपादन मराठी महासंघाच्या राज्य सल्लागार, डॉ. अंजना खताळ, मुंबई यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ भंडारा, द्वारा आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाइन अभिनय स्पर्धेच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, नुकत्याच दहावी, बारावी बोर्डच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन बोर्ड परीक्षेत कापीमुक्त अभियान यशस्वी करून शासनास सहकार्य करावे व आपले भवितव्य उज्ज्वल करावे.
यावेळी अभिनय स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडाऱ्याच्या प्राचार्या रत्नप्रभा भालेराव ह्या होत्या, तर सहउद्घाटक म्हणून जि. प.भंडाराचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. रवींद्र सोनटक्के होते. यांनीही विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाबद्दल विस्तृत माहिती देऊन व स्पर्धा विषयक उपक्रमात हिरीरीने भाग घेण्याबद्दलचे मार्गदर्शन केले. तसेच मराठी महासंघाचे राज्य सचिव प्रा. बाळासाहेब माने, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, मार्गदर्शक डॉ. विठ्ठल चौथाले, राज्य सल्लागार प्रा. संजय पाटील डॉ. विजय हेलवटे, ऑनलाइन उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हास्तरीय ऑनलाईन अभिनय स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक साहिल जितेंद्र मस्के, गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढा ता- पवनी, द्वितीय क्रमांक कु. कशिष रोशन शेंडे , शशिकांत दैठणकर कनिष्ठ महाविद्यालय बारव्हा, ता- लाखांदूर, तृतीय क्रमांक
कु. रिंकू हेमराज येळने , गांधी कनिष्ठ महाविद्यालय पहेला ता – भंडारा
तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक वंशीका लेखीचंद सोनवणे , एस.एन. मोर महाविद्यालय तूमसर, तन्हू सुभाष काळबाधे, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्वाफा ता- साकोली ,नंदिनी इस्तारी बुराडे , प्रशांत कनिष्ठ महाविद्यालय भागडी, ता. लाखांदूर यांनी पटकाविले.
या स्पर्धेचे स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. वसुधा रामटेके, ब्रह्मपुरी (चंद्रपूर )
डॉ. जुगल धोटे ( यवतमाळ), प्रा. धीरण राठोड (यवतमाळ ), प्रा. हेमंत मगरे,चामोर्शी ( गडचिरोली ) प्रा संजय मुंडे, जिवती ( चंद्रपूर )
प्रा गजानन सातपुते, वरोरा ( चंद्रपूर ) प्रा. मेघा राऊत (नागपूर ) यांनी काम सांभाळले.
या स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातील जवळपास 51 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. दुसऱ्या दिवशी स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे प्रा. यशवंत पवार, प्रा.पवन कटरे, प्रा. नामदेव मोरे, प्रा. विजया मने, प्रा. सुरेश नखाते, प्रा. ओमप्रकाश ढोरे, प्रा. दीपा ठाणेकर, प्रा. चांगदेव खोले, प्रा.विजयकुमार सावंत, डॉ. शरद दुधाट, प्रा. संतोष कदम, प्रा. सुनील कावरखे, प्रा. गणेश शिंदे, प्रा.गजानन सातपुते, प्रा. बाबासाहेब माळवे, प्रा. सुषमा पाटील प्रा. संजय कावरे प्रा. संजय गोळे, इत्यादींनी अभिनंदन केले…
या स्पर्धेचे नियोजन व संचालन प्रा. संजय लेनगुरे ( राज्य कोषाध्यक्ष ) यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रांजली दरवळकर, तर आभार प्रा. जितेंद्र टिचकुले यांनी मानले. कार्यक्रम नियंत्रण अधिकारी म्हणून प्रा. छगन झंजाळ, प्रा. प्रियंका बोपचे, प्रा. प्रवीण वंजारी, प्रा. दुर्गेश वंजारी यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.उत्तम बनवाडे, प्रा. प्रीती कांबळे प्रा.दुर्वास लंजे, प्रा.दिलीप करंबे, प्रा. मुनेश्वर राऊत, प्रा. केशव कापगते, प्रा. विनोद कांबळे, प्रा.कोमल मानकर, प्रा.निशिकांत ईश्वरकर, प्रा.नरेंद्र गायधने, प्रा.भूपेंद्र भुसारी, प्रा. वैशाली काळे, प्रा. वर्षा सुखदेवे, प्रा. शालिनी कापगते, प्रा. प्रकाश कोळी, प्रा. शुभम सांगोळे यांनी अथक परिश्रम घेतले.






