spot_img
spot_img
20.1 C
New York
Tuesday, June 9, 2026

भद्रावतीत खैरे कुणबी समाजाचा तालुकास्तरीय मेळावा व सत्कार सोहळा

भद्रावती : खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ भद्रावती तर्फे दि. १९ रोज रविवारला सकाळी १० वाजता शहरातील मुर्लीधर पाटील गुंडावार सभागृहात समाजाच्या तालुका स्तरीय कौटुंबिक स्नेहमिलन व सत्कार सोहळा तथा महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सदर सोहळ्याला तालुक्यातील समाजबांधवांनी सहकुटुंब सहपरिवार ऊपस्थीत राहुन होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व समाज बांधणी साठी एकत्र यावे असे आवाहण खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ भद्रावती तर्फे करण्यात आले आहे.

भद्रावती येथे खैरे कुणबी समाज मंडळाची बैठक : खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ भद्रावती तर्फे शहरातील मुरलीधर पाटील गुंडावार सभागृहात दिनांक १९ रोज रविवारला सकाळी दहा वाजता समाजाचा तालुका स्तरीय कौटुंबिक मेळावा तथा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वरद विनायक मंदिर गवराळा येथील भक्तनिवास येथे दिनांक 16 रोज गुरुवारला बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत सदर कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली व विविध बाबींचे नियोजन करण्यात आले. बैठकीला समाजातील जेष्ठ समाज बांधवांनी मार्गदर्शन केले. बैठकीला मंडळाचे हनुमान घोटेकर, आत्माराम देशमुख, अश्विन हुलके, प्रशांत राऊत, विठ्ठलराव मांडवकर, मारोतराव सहस्त्रबुद्धे, दशरथ सातपुते, निलेश बोरकुटे, लंकेश देशमुख, अतुल कोल्हे, शिरू पाल, शंकर घोटेकर आदी उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!