शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती….
राज्यातील समस्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन….
चंद्रपूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर महामंडळाचे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर येथे १९ जानेवारी २०२५ रोजी शहीद बालाजी रायपूरकर सभागृह पिंपळनेर रोड येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष अनंता चौधरी यांनी केले आहे.
शिक्षकेत्तर महामंडळाचे ५२ वे अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शिक्षण मंत्री मा. दादा भुसे उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनासाठी शिक्षक आमदार व पदवीधर आमदार उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून हजारो शिक्षकेत्तर बंधू, भगिनी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिक्षकेतर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी दिली. संघटनेचे माध्यमातून माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते, ते महामंडळाच्या माध्यमातून यापूर्वी सोडवण्यात आले असून उर्वरित प्रलंबित प्रश्न देखील लवकरात लवकर महामंडळाच्या सहकार्याने पूर्ण होणार आहेत.
या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यातील जास्तीत जास्त शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रपूर जिल्ह्याचेअध्यक्ष मोरेश्वर वासेकर, सचिव प्रशांत हजारे, कोषाध्यक्ष अनंता चौधरी यांनी केले आहे.






