spot_img
spot_img
22.4 C
New York
Friday, July 31, 2026

योगा स्पोर्ट चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेत आकांक्षा कटलावार हीचा तृतीय क्रमांक

भद्रावती : आंध्रप्रदेश येथील विशाखापटनम मध्ये नुकत्याच पार पडलेल्या युनिवर्सल योगा स्पोर्ट फेडरेशन द्वारा आयोजित २८ डिसेंबर २०२४ योगा स्पोर्ट चॅम्पियनशिप २०२४ ट्रॅडिशनल योगा ज्युनिअर गर्ल्स वयोगट पाच ते सात या वयोगटात कु.आकांक्षा कटलावार ही ने तृतीय क्रमांक पटकविला. युनिव्हर्सल योगा स्पोर्ट फेडरेशन युनिव्हर्सल योगा अलायन्स चे अध्यक्ष सुरेश कुमार यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

आकांक्षा ही वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अष्टांग ज्योती योग नॅच्युथेरपी सेंटरच्या संचालिका योगगुरु डॉक्टर पूजा देवराव देऊरकर यांच्याकडे ती योगा शिकत आहे. आकांक्षा ही ने अनेक योग स्पर्धा खेळून यश संपादन केले आहे. योग गुरूंच्या पालावर पाऊल ठेवून ती यश संपादन करीत आहे याचा सगळ्यांना आनंद वाटतो. तीच्या यशाचे श्रेय डॉ. पूजा यांना जाते.आकांक्षाचे वडील हे दिल्ली येथील सीआरपीएफ मध्ये सैनिकी दलात कार्यरत आहे. तिच्या या यशाबद्दल शिक्षक वृंद तसेच घरातील आई वडील, आजी आजोबा, मोठे वडील आई, भावंड तसेच भद्रावतीकरांनी यशाबद्दल तिला प्रोत्साहन देऊन तिचे सर्वत्र कौतुक केलेले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!