spot_img
spot_img
25.1 C
New York
Saturday, June 6, 2026

वाॅक्याथान फलकाचे अनावरण…

भद्रावती

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती च्या वतीने आयोजित वाॅक्याथान फलकाचे अनावरण दि. ३ जानेवारी २०२५ ला सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावरती ही सामाजिक दायित्व लक्षात घेऊन सामाजिक उपक्रमात सतत सहभागी असते. मागील तीन वर्षापासून सातत्याने भद्रावतीकरांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करत असते. त्यातीलच एक भाग म्हणून यावर्षी “आठवणी बालपणीच्या” या थीम ला धरून यावेळी वाॅक्याथान स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेच्या फलक अनावरणाचा कार्यक्रम काल भद्रावती येथील आंबेडकर चौकात संपन्न झाला. यात प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ता धनराज आस्वले, भद्रावती शिक्षण संस्थेचे भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, सदस्य डॉ जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ एल. एस. लाडके, प्राचार्य डॉ सुधीर मोते यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगोपालांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी धनराज आस्वले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच डॉ विवेक शिंदे यांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.

यावेळी भद्रावतीकर प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ अपर्णा धोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ नत्थु वाढवे यांनी केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!