भद्रावती
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वसा आपण पुढे नेला पाहिजे असे आवाहन केले.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष प्राचार्य सुधीर मोते, प्रमुख अतिथी प्रा. उज्वला वानखेडे , वर्षा दोडके, संगीताचा जक्कुलवार उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांची समायोजित भाषणे झाली.
यात अक्षय भोसकर, सोहम गेडाम, आचल ऊईके, लावण्या खंडाळकर, प्रियंका चौधरी , माही ढोके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांची उकल केली. कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रा. प्रवीण मत्ते सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रणीता बोकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रुती नागपुरे यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. प्रेमा पोटदुखे , विजया मुक्तावरम, दुर्गा धकाते , ठोंबरे मॅडम, प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, भीष्माचार्य बोरकुटे, राकेश आवारी, डॉ प्रशांत पाठक, किशोर ढोक , रमेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






