भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे नवीन वर्षाप्रित्यर्थ आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले. आनंद मेल्याचे उद्घाटन डॉ जयंत वानखेडे विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रा.अतुल गुंडावार हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यात चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला कौशल्य यांचे प्रदर्शन करत आनंद मेळ्याचा आनंद घेतला. त्यात विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञाना सोबतच व्यवहार कौशल्य अवगत केले. सोबतच विविध पाककलेचे कौशल्य प्राप्त करून स्वादिष्ट पदार्थ विक्रीस ठेवले . त्याचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
या कार्यक्रमाचे प्रस्त प्रस्ताविक प्रा. प्रेमा पोटदुखी यांनी केले सूत्रसंचालन प्रा वर्षा दोडके यांनी केले , तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






