spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

दोन दिवसीय कृतीपत्रिका मार्गदर्शन संपन्न …

मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर द्वारे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम…

चंद्रपूर

मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर द्वारा चंद्रपूर जिल्ह्यातील वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी मार्गदर्शन उपक्रम राबवण्यात आला. मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर द्वारा वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची कृतीपत्रिका सोडवितांना घ्यावयाची दक्षता यासंबंधी दोन दिवसीय मार्गदर्शन आभासी पद्धतीने राबवण्यात आले.

या मराठी कृती पत्रिका मार्गदर्शन उपक्रमाचे उद्घाटन डॉ ज्ञानेश हटवार, उपाध्यक्ष, मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. संजय लेनगुरे, खजिनदार, मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य हे होते. प्रमुख अतिथी डॉ विजय हेलवटे, सल्लागार, मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य, प्राचार्य डॉ सुधीर मोते हे होते. उद्घाटन प्रसंगी “मराठी विषय शिक्षक महासंघ ही फक्त शिक्षकांची संघटना नसून, मराठी विषय समृद्ध करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत असते, हा त्यातीलच एक भाग आहे . या मार्गदर्शन उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक गुणांकन प्राप्त करता येईल” असे मार्गदर्शन केले.

मराठी विषय कृतीपत्रिका मार्गदर्शन उपक्रमात मराठी विषयातील पाचही घटकावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या दिवशी गद्य या विभागावर डॉ. अंजली खताळ मुंबई, सल्लागार, मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ शालिनी तेलरांधे, नागपूर यांनी कथा साहित्यप्रकार यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले . माझी प्राचार्य तथा माजी मुख्य समिक्षक नागपूर बोर्ड नागपूर धर्मराज काळे सर यांनी निबंध लेखन यावर विद्यार्थ्यांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

कृतीपत्रिका मार्गदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी पद्य विभागावर डॉ विठ्ठल चौथले गडचिरोली यांचे मार्गदर्शन लाभले. उपयोजित मराठी या घटकावर डॉ सुधीर रायपूरकर नागपूर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. व्याकरण या घटकावर माजी प्राचार्य धर्मराज काळे, सल्लागार, मराठी विषय शिक्षक महासंघ, चंद्रपूर यांनी व्याकरण विषय विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले.

या आभासी सभेचे प्रास्ताविक प्रा. नामदेव मोरे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी मोहितकर, सरिता कांचेवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पद्मा पालांदुरकर, रेणुका देशकर यांनी केले. या दोन दिवशीय आभासी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्रा. गजानन सातपुते, सचिव प्रा. देविदास सालवटकर, प्रा. मुंडे सर, प्रा. नरेंद्र विखार, प्रा. किशोर ढोक, विनोद कुनघाटकर, प्रधान सर, सोनकुसरे सर, गहाने सर, भोयर सर, समस्त मराठी विषय शिक्षक पदाधिकारी, समसत शिक्षक यांनी सहकार्य केले.

या ऑनलाईन सभेला समस्त राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, समस्त जिल्हा प्रतिनिधी, तसेच जिल्हा पदाधिकारी, मराठी विषय शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!