नवीन तारीख लवकरच जाहीर करणार…
भद्रावती
भद्रावती येथे होणारा नियोजित २० ते २५ डिसेंबरला होणारा रोटरी उत्सव मेला तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात आला. रोटरी उत्सव मेल्याची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे अध्यक्ष किशोर खंडाळकर यांनी जाहीर केले.
भद्रावती येथे रोटरी क्लब भद्रावती तर्फे घेण्यात येणारा नियोजित रोटरी उत्सव मेला दिनांक २० ते २५ डिसेंबरला आयोजित करण्यात आला होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे या तारखेला होणारा नियोजित रोटरी उत्सव मेला हा पुढे ढकलण्यात आलेला आहे.
पुढे घेणाऱ्या रोटरी उत्सव मेल्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत अध्यक्ष किशोर खंडाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या नियोजित मेळाव्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संदर्भात घेण्यात आलेले ऑडिशन हे कायम राहून, पुढे होणाऱ्या रोटरी उत्सव मेल्यात त्या समस्त स्पर्धकांना संधी मिळणार आहे. रोटरी मेल्याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, काही तांत्रिक अडचणीमुळे हा मेळा पुढे ढकलण्यात येत आहे.
या पत्रकार परिषदेत रोटरी क्लबचे अध्यक्ष किशोर खंडाळकर, सचिव आत्माराम देशमुख, माजी अध्यक्ष व उत्सव चेअरमन अनिलभाऊ धानोरकर, सुनीलभाऊ पोटदुखे , डॉ माला प्रेमचंद, सुधीर पारधी, डॉ ज्ञानेश हटवार, तथा रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.






