गडचिरोली : पुणे येथे ७ ते १२ डिसेंबर या कालावधीत १९ व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात गडचिरोली पोलिस दलातील हनी नामक श्वान कांस्य पदकाचा मानकरी ठरला. सोबतच बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अंमलदार धम्मदीप मेश्राम हे रजत, तर हवालदार पंकज हुलके हे कांस्य पदकाचे मानकरी ठरले.

या मेळाव्यात सायंटीफिक एड टू इन्व्हेस्टीगेशन, पोलिस फोटोग्राफी, व्हीडिओग्राफी, कॉम्प्युटर अवेअरनेस, अँटी सॅबोटेज चेक, श्वानपथक अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. राज्यातील २५ पोलिस दल सहभागी झाले होते. त्यात गडचिरोली पोलिस दलाने ७ वे स्थान प्राप्त केले. ‘घातपात विरोधी तपासणी’ या स्पर्धेत गडचिरोली पोलिस दलातील ‘हनी’ नामक श्नानाने ‘एक्सप्लोजिव्ह डिटेक्शन’ या उपप्रकारात कांस्य पटक पटकावले. अंमलदार धम्मदीप मेश्राम हे रजत, तर हवालदार पंकज हुलके हे कांस्य पदकाचे मानकरी ठरले. पोलिस अधीक्षक यांनी पदकप्राप्त पोलिस आणि श्वानाचे कौतूक केले.






