ग्रामपंचायत च्या महसूल मधील ५ टक्के अपंग निधीतून केला वाटप
शेगाव :- स्थानिक शेगाव (बु) ग्रामपंचायत ने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती चे अवचित्त साधून शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतला मिडनाऱ्या महसूलतील ५% निधीतून गावातील अपंग बांधवाना किरणा समानाच्या किटाचे वाटप केले. यात गावातील १००% अपंग असलेले ५ तर काही ९०% अपंग असलेले तर उर्वरित काही ४०% प्रमाणात अपंग असलेल्या एकूण ४८ बांधवाना किट वाटप करण्यात आले.
त्यावेळी सरपंच सिद्धार्थ पाटील, उपसरपंच साधना मानकर, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य यशवंत लोडे, प्रफुल वाढई, शंकर घोडमारे, ग्रामपंचायत कर्मचारी अनंता कोटकर, नंदू चौधरी व गावकरी उपस्थित होते.






