spot_img
spot_img
6.4 C
New York
Saturday, November 28, 2026

महा.साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद जिल्हा चंद्रपूर तर्फे प्रेस स्वत्रंता दिवस उत्साहात साजरा

तथा पत्रकार, मान्यवरांचे शाल, पुष्प गुच्छ व सन्मान चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला

चंद्रपुर : जागतीक पत्रकार दिन ३ मे ला संपुर्ण विश्वामध्ये साजरा करण्यात येत असून हा दिवस पत्रकारासाठी फार महत्त्वाचा आहे. जागतीक पत्रकार स्वतंत्रता दिन ३ मे २०२३ ह्या दिवसाचा चंद्रपुर जिल्ह्यातिल अनेक लाेकप्रिय दैनिक वृत्तपत्रांना तसेच प्रिंट मिडियाला याचा विसर पडला दिसुन येत हाेते. परंतु महा.साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद जिल्हा चंद्रपूरच्या वतीने विश्व प्रेस स्वतंत्रता दिवस पत्रकार बांधवांचा उपस्थित मृणालगीरी सभागृह बँरिस्टर राजाभाऊ खाेबरागडे जयंत टॉकिज चाेैक मेन राेड चंद्रपुर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लेखक, प्रख्यात विचारवंत डॉ.प्रा.ईसादास भडके हाेते. कार्यक्रमाचे उदघाटक म्हनुन जेष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक बहुजन ललकारचे संपादक डी.के.आरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर मुख्य अतिथी म्हनुन दैनिक चंद्रपुर समाचार चे संपादक चंद्रगुप्त रायपुरे, मोरेश्वर बारसागडे, माजी प्राचार्य जि.प.ज्युबलि ज्यु.कॉ.चंद्रपूर तथा प्रा.मनोज भैसारे, साहित्यीक विचारवंत चंद्रपूर प्रामुख्याने उपस्थित हाेते. या कार्यक्रमात कलम मागे इंसाफ चे संपादक सय्यद रमजान अली हे विशेष पाहुणे म्हनुन मंचावर उपस्थित हाेते. तसेच पत्रकार आक्केवार यांची ही खास उपस्थिती हाेती. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हनुन राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघाचे राज्य सचिव तथा दैनिक कळंब नगरीचे उपसंपादक निलेश ठाकरे यांनी सर्व पाहुण्याचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला बारसागडे यांनी आपल्या भाषनातुन पत्रकारीतचा ईतिहास व आजच्या दिवसाचे महत्व उपस्थितांना पटवुन दिले. डि.के.आरिकर यांनी देशाच्या विद्यमान परिस्थितीचा आढावा घेत आपले मनाेगत व्यक्त करतांना अनेक विषयावर सर्वांचे लक्ष वेधले. चंद्रगुप्त रायपुरे यांनी आजच्या कार्यक्रमाचे महत्व काय याचा आम्हाला ही विसर पडला असतांना गाेपी गाेविंद मित्रा यांनी मात्र आवर्जुन आठवन ठेवुन हा कार्यक्रम राबवला म्हनुन आयाेजकांनचे त्यांनी आभार व्यक्त केले. सय्यद रमजान अली यांनी आक्रमक स्वरूपात भाषण करित पत्रकारांच्या अनेक समस्यांवर बाेलतांना पत्रकारांना हाेणारा त्रास यावर प्रकाश टाकत आज पत्रकारांची स्वतंत्रता राहीली नसुन पत्रकारांनी पेटुन उठण्याची आता वेळ आली असे सांगत पत्रकारांना मार्गदर्शन केले. भैसारे सरांनी सुध्दा आपले उत्कृष्ठ भाषण करित सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वागत अध्यक्ष म्हनुन निलेश ठाकरे यांनी आपल्या भाषणातुन सर्व पत्रकारांना संबाेधित करतांना आपल्या डाेळ्यापुढे प्रशासनाच्या चुका हाेत असतात त्या चुका पत्रकारांने शाेधायला हव्या असे सांगत पुढे बाेलतांना राजकारणी नेत्यांचा फित्या कापल्या गेल्याचा आणि त्यांनी जनतेला दिलेल्या फाेकळ आश्वसनाच्या बातम्या प्रसारित व प्रकाशित न करता मुद्देशिर बातम्या लावुन शासन प्रशासनाचा भ्रष्ट्राचार हा जनते समाेर उघडीस आनायला पाहीजे या करिता पत्रकारांना आव्हान केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षिय भाषणात डॉ.प्रा.ईसादास भडके यांनी न विसरता कार्यक्रम राबवणारे गाेपी गाेविंद मित्रा व त्यांचा चमुची प्रशंसा करित येणाऱ्या दिवसात गाेपी गाेविंद मित्रा यांचा सन्मान व सत्कार व्हायला हवे व ते आम्ही या पुढचा सत्कार कार्यक्रम करू अशी प्रेस स्वतंत्रता दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी घाेषणा केली. या वेळेस जिल्ह्यातिल अनुभवी जेष्ठ पत्रकार पाेतनवार यांचा तसेच ईतर पत्रकार, मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन करतांना आजाेजक गाेपी गाेविंद मित्रा यांनी आपला प्रेक्षकवर्गावर वेगळा ठसा उमटवला. हा सर्व कार्यक्रम यशश्वी करण्याकरिता आयाेजक गाेपी गोविंद मित्रा, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष म.सा. ग्रा.पत्रकार परिषद तसेच राष्ट्रवार्ता चे संपादक सचिन बोबडे, हैलाे चांदा न्युजचे संपादक शशि ठक्कर, राहुल बहादे, धनराज काेवे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच उपस्थित प्रेक्षक, पत्रकार, मान्यवर यांनी आपला अमुल्य वेळ दिला त्या बद्दल कार्यक्रमाच्या आयाेजकांचा वतीने जयप्रकाश कांबडे यांनी आभार मानले मानले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!