spot_img
spot_img
29.4 C
New York
Tuesday, August 4, 2026

विवेकानंद महाविद्यालयात डॉ. विजय टोंगे यांना निरोप

भद्रावती/प्रतिनिधी

स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील वाणिज्य विभागप्रमुख डॉ. विजय टोंगे यांना सेवानिवृत्ती निमित्ताने निरोप देण्यात आला. महाविद्यालयाच्या परिसरातील योगी अरविंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान होते. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती डॉ. विजय टोंगे, त्यांच्या अर्धांगिनी अनिता टोंगे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थाध्यक्ष स्वान म्हणाले की,”सेवानिवृत्ती हा प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील रुटीन भाग असतो. परंतु सेवानिवृत्ती नंतर थांबायचे नसते. सेवानिवृत्तीनंतर आयुष्याची दुसरी इनिंग सुरुवात करायची असते.आजच्या नंतर नवीन उर्जा घेऊन आपला वेळ समाजाच्या सत्कारणी लावून समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा. यापुढेही महाविद्यालयाला गरज पडल्यास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी गतकालीन अनेक स्मृतींना उजाळा दिला. आपल्या भाषणात प्राचार्य डाॅ.नामदेव उमाटे यांनी महाविद्यालयाच्या सुरुवातीपासून सत्कारमूर्तींनी महाविद्यालयाच्या प्रगतीत डॉ टोंगे यांनी दिलेल्या योगदानाची माहिती देत महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते कसे प्रयत्नशील होते हे सांगितले.

यावेळी डॉ. ज्योती राखुंडे, डॉ. सुधीर आस्टुनकर, डॉ. रमेश पारेलवार, डॉ.जयवंत काकडे, प्रा. धनंजय बेलगांवकर , प्रा. श्रीकांत दाते, प्रा. रामकृष्ण मालेकर, वामन अंड्रसकर यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी आपल्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. यावेळी संस्थाध्यक्ष श्री.स्वान याच्या हस्ते विवेकानंद ज्ञानपीठाच्या वतीने टोंगे दाम्पत्याला भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य उमाटे टोंगे दाम्पत्याला भेटवस्तू दिल्या. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सामूहिक भेटवस्तू दिल्या. यावेळी महाविद्यालयातील सेवानिवृत्त लिपिक श्री. रमण मुळे यांनाही संस्थेच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विवेकानंद संगीत कला अकादमीचे अमित लभाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरेल आवाजात निरोप गीते गावून उपस्थितांना रिझवले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गजानन खामनकर, संचालन सुरभी भागडे, आभार प्रदर्शन दीपक तेलंग यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!