ईनरव्हील क्लब भद्रावतीचा उपक्रम…
भद्रावती :
अलिकडे भद्रावती शहराची ओळख” स्पर्धांचं शहर ” म्हणूनही उदयास येत आहे. राजकीय पक्ष तसेच विविध संघटना विविध प्रकारच्या स्पर्धा घेत असतात. भद्रावती व परीसरात अनेक सामाजिक उपक्रम राबविणारी सामाजिक संघटना ” ईनरव्हिल क्लब ऑफ भद्रावती ” द्वारा
दिनांक २.१२.२०२४ रोज सोमवार ला माँ चंडीका मंदिर परीसरात एक आगळी वेगळी/ हटके स्पर्धा आयोजित करन्यात आली.
स्पर्धेचं नांव होतं ” दिवाळी फराळ स्पर्धा ” .या फराळ स्पर्धेमधे फक्त चिवडा, लाडू, चकली व शंकरपाळे यांचाच समावेश ठेवन्यात आला. उत्कृष्ट व चवदार (Tasty)फराळ बनविनाऱ्या प्रथम तीन विजेत्या गृहणी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसं ठेवन्यात आली. प्रथम क्रमांक पटकविनाऱ्या गृहणी ला डिनर सेट तर द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविनाऱ्या गृहणींना किचनसेट म्हणून बक्षिसं ठेवण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक डिंपल गुरनुले यांना डिनर सेट देऊन विजेत्या ठरल्या. द्वितीय क्रमांक स्वाति चारी व तृतीय क्रमांक वैशाली लांडगे या किचनसेट देऊन विजेत्या ठरल्या.
या स्मपर्धेचे परिक्षण शिंदे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ.
ऊज्वला वानखेडे मॅडम यांनी या स्पर्धेची परीक्षक म्हणून जवाबदारी पार पाडली. ईनरव्हिल क्लब ऑफ भद्रावतीच्या अध्यक्षा सौ.प्रेमा पोटदुखे व सहकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विषेश परिश्रम घेतले.






