गावकाऱ्यांच्या विविध समस्यानं बाबत ग्रामपंचायत उदासीन
शेगाव (बु) ग्रामपंचायत ही तालुक्यातील सागळ्यात मोठी ग्रामपंचायत असून. गावातील लोकसंख्या ही १० हजार च्या वर आहे. मात्र तेवढ्याच मोठ्या समस्यांचे माहेर घर म्हणून शेगाव (बु) ही ग्रामपंचायत परिसरात ओळख निर्माण करीत आहे.
मागील अनेक वर्षां पासून शेगाव (बु) गावातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही. या साठी ग्रामपंचायत ने १५ व्या वित्त आयोगातून २ विहारी चे खोदकाम केले. त्याला विहरीला अपेक्षे पेक्षा जास्त प्रमाणात पाणी आहे. पण लाखो रुपये खर्च करून विहारी खोदलेल्या असताना सुद्धा अजून पर्यंत जनतेला त्या विहारीचे पाणी पिण्यास मिळालेले नाही.
जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये हर घर नळ योजना राबविण्यात आली त्या साठी गावातील रस्त्याचे तीन तेरा वाजवत वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने खोदकाम सुद्धा करण्यात आले. परंतु मागील २ वर्षा पासून ही योजना थंड बसत्यात असून याचा कुठलाही उपयोग जनतेला झालेला नाही. तसेच खोदलेल्या या रस्त्यामुळे जनतेला वाहतुकीस समस्या वारंवार निर्माण होत आहे.

तसेच ग्रामपंचायतकडुन ५ कचरागाडी खरेदी करण्यात अली पण त्याचाही फायदा जनतेला मिळालेला नाही. त्यातील काही गाड्या ह्या जागेवरच धूळ खात असून फक्त एक किव्हा दोन गाड्या आठवड्यातून एकदा किव्हा दोनदा गावात फिरत असते. त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. तसेच दरवर्षी ग्रामपंचायत कडून लाखो रुपये खर्च करून नालीसफाई करण्यात येते. परंतु एवढा खर्च करून सुद्धा आजही नाल्यांमध्ये प्लस्टिक, नालीतील गाळ जमा असून दुर्गंधी सर्वत्र पसरलेली आहे.

तसेच शेगाव ग्रामपंचायत ही तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असून सुद्धा गावामध्ये कुठेही स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. फक्त बाजारवाडी मध्ये आधीच एक स्वच्छता गृह उपलब्ध असून गरज नसताना दुसऱ्याची निर्मिती करून जनतेचा लाखो रुपये विनाकारण खर्च केला तरीसुद्धा त्यातील एकही स्वच्छतागृह जनतेच्या सुविधेत उपलब्ध नाही. गावामध्ये ठीक ठिकाणी मुख्य रस्त्यावर, बस्थानक ते जिल्हा परिषद शाळा, आष्टा कडे जाणारा मार्ग, गावातील छोटे रस्ते, गुजरी भरण्याचे ठिकाण, इंडियन बँक परिसर, बाजारवाडी अशा ठिकाणी अतिक्रमणाचे जाळे पसरले असल्या कारणांनी वारंवार वाहतूक अडथळे निर्माण होत आहे. मात्र शेगाव ग्रामपंचायत ने या गावाच्या या सगळ्या समस्याकळे जाणीवपूर्वक डोळेझाक केलेले आहे असेच चित्र दिसून येत आहे…






