भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती येथील प्राचार्यपदी सेवाज्येष्ठ प्रा. डॉ. सुधीर मा. मोते यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चिचोर्डी-भद्रावती येथील प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे सर हे नियत वयोमानानुसार ३१ आक्टोबर २०२४ ला सेवानिवृत्त झालेत. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर सेवाज्येष्ठ प्रा. डॉ. सुधीर मा. मोते यांना पदोन्नती देऊन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीने प्राचार्य पदी नियुक्ती केली.
डॉ. सुधीर मोते प्राचार्यपदी विराजमान झाल्याबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष, डॉ. विवेक शिंदे, सचिव, डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव, डॉ. विशाल शिंदे, विश्वस्त श्रीमती नीलिमाताई शिंदे, डॉ. जयंत वानखेडे तसेच समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.






