भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे महाराष्ट्र राज्य चित्रकला ग्रेड परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय परीक्षे सोबतच अनेक शाळा बाह्य परीक्षा घेतल्या जातात. या केंद्रावर चित्रकला ग्रेड परीक्षा मागील २००० सालापासून सातत्याने घेतली जात आहे. येथे सुरू असलेल्या चित्रकला ग्रेड परीक्षेत एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षेसाठी ५० विद्यार्थी प्रविष्ट झालेले असून त्यांची परीक्षा या केंद्रावर सुरळीतपणे सुरू आहे. या परीक्षेचे केंद्राध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ जयंत वानखेडे व पर्यवेक्षक म्हणून सुहास कोल्हे यांनी परीक्षेचे यशस्वी संचालन केले.
या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, डॉ सुधीर मोते , डॉ. ज्ञानेश हटवार, प्रा. किशोर ढोक, प्रा अतुल गुंडावार, प्रा. नरेश जांभूळकर, आत्माराम देशमुख यांनी केंद्राला भेट देऊन
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.






