धार्मिकते बरोबरच सामाजिकत्व जपण्याचा एक प्रयत्न
दि. २६ सप्टेंबर
वरोरा
सध्या सुरु असलेल्या मस्कऱ्या गणेश उत्सवामध्ये चंद्रपूर जिल्यातिल शेगाव बु येथे न्यु झंकार मस्कऱ्या गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सरकारी दवाखाना चंद्रपूर येथील रक्तपेढीला पाचारण करण्यात आले या मध्ये गावातील २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून धार्मिक भावणेसोबत सामाजिक दाईत्व जपण्याचा संदेश या निमित्ताने सगळ्यांना देणार आला. हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यवाहक-अक्षय बोंदगुलवार, मंडळाचे अध्यक्ष अमोल दातारकर, आकाश नाकाडे, सूरज झाडे, करण गजबे, चेतन गजबे, चंदू हनवते, व न्यू झनकार मस्कऱ्या गणेश मंडळाचे सर्व सदस्य व गावकरी मंडळी यांनी मोलाचे सहकार्य केले






