भद्रावती
पंचायत समिती भद्रावती अंतर्गत तालुका स्तरीय कला महोत्सव नुकताच कर्मवीर विद्यालय गवराळा येथे गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष कल्पना सिध्दमशेट्टीवार शि. वि. अ
उद्घाटक डी.डी.दोहतरे प्राचार्य कर्मवीर विद्यालय गवराळा हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कला उत्सव कार्यक्रमामधील तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. कला महोउत्सवा मध्ये सहा कलेचा प्रकारांचा अंतर्भाव होता. त्यांमध्ये गायन ,वादन ,नृत्य, नाट्य ,पारंपारिक कथा तसेच दृश्य कलेचा समावेश होता. या कार्यक्रमात
प्रत्येक कले मध्ये वेगवेगळ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली कला प्रदर्शित केली.
या कार्यक्रमाला प्रत्येक महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षक वृंद उपस्थित होते . त्यांनीही मोठ्या उत्साहाने आपल्या मुलांचा सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. प्रतिभा कवाडे विषय साधन व्यक्ती यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कु.छाया खनके विषय साधन व्यक्ती यांनी केले.
कार्यक्रमाला गटसाधन केंद्रातील साधनव्यक्ती, समावेशित तज्ज्ञ विशेष शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मा. जलील शेख शि. वि. अ यांच्या गीताने झाली. कार्यक्रमाचा शेवट वंदेमातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






