राष्ट्रीय स्तरावर खो-खो साठी निवड होणारी जि. प. शाळेची चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली विद्यार्थिनी
दि. २४ सप्टेंबर
वरोरा
नुकत्याच अमरावती इथे दि. २१ व २२ सप्टेंबर २०२४ ला झालेल्या खो-खो अजिंक्य पद स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा संघाकडून नैपुण्य दाखवील्याने जिल्हा परिषद शाळा खेमजई ची वर्ग ८ ची विद्यार्थिनी कु. पल्लवी सतीश दाते हिची विदर्भाच्या किशोरी गटात निवड करण्यात आली आहे.
या नंतर ती पुढील झारखंड राज्यामधल्या सिमदेगा जिल्यातील अल्बर्ट इक्का स्टेडियम मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कु. पल्लवी ही शेतकरी कुटुंबातील असून ग्रामीण भागातील विद्यार्थिनीच्या राज्य स्तरीय निवळीमुळे सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या ह्या यशा साठी शाळेतील शिक्षकवृंद व विकास ग्रुप शेगाव व विकास ग्रुप खेमजई कडून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे.






