जिल्हात अव्वल सर्वत्र खेळाडूंचे कौतुक..
भद्रावती
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे दिनांक २०/९/२०२४ ला पार पडल्या. या जिल्हास्तरीय स्पर्धेत 19 वर्ष मुले वयोगटात अंतिम सामन्यात ब्रह्मपुरी संघाचा दारुण पराभव करत
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती या संघाने घवघवीत यश संपादन केले व जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत हा संघ चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या विजयी संघात शर्विल हटवार, साहिल शेट्टी, प्रद्युमन ठाकरे, प्रणव कारेकर ,पियुष नागपुरे, पार्थ दोडके, गौरव ढवस, गोपाल दडमल, गीतेश नागपुरे, क्रिष्णा गावंडे, आर्यन भडके, सम्यक पाटील या खेळाडूंचा सहभाग आहे.
जिल्हास्तरावर हॉलीबॉल स्पर्धेत अव्वल येऊन विभाग स्तरावर निवड झाल्याने व्हॉलीबॉल खेळाडू संघाचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, क्रीडाशिक्षक रमेश चव्हाण, डॉ ज्ञानेश हटवार ,माधव केंद्रे, किशोर ढोक, डॉ प्रशांत पाठक, शुभम सोयाम, जिल्हा व्हाॅलिबाॅल प्रशिक्षक ऊईके, समस्त प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.






