कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ भंडाराचा अनोखा उपक्रम…!
भंडारा
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ भंडारा द्वारा आयोजित,” शिष्य बनले गुरुवर्य ” जिल्हास्तरीय स्वयंशासन स्पर्धा, दिनांक 22, 23, 24 सप्टेंबरला पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ७२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा निकाल दिनांक २६ सप्टेंबरला ऑनलाईन घोषित करण्यात आला. त्यात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक कु. कशीष रोशन शेंडे, दैठणकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बारव्हा. ता. लाखांदूर हिने पटकाविला. द्वितीय क्रमांक कु. रीना राजेश निमजे जि. प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सिहोरा, ता. तुमसर हिने तर तृतीय क्रमांक कुमार तीर्थ भुपेश शेंडे याने मिळविला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक कु. सलोनी गजेंद्र मेश्राम, द्वितीय क्रमांक वर्षा आशिष जनबंधू, तर तृतीय क्रमांक अंशिका रमेश उके यांनी प्राप्त केले.
जिल्हास्तरीय स्वयंशासन स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, मराठी महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनील डीसले( बारामती) महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रतिभा बिश्वास, डॉ. ज्ञानेश हटवार, डॉ. सुधीर मोते, डॉ.सोमेश्वर सेलोकर यांनी स्थान भूषविले. तर प्रमुख अतिथीचे स्थान मराठी महासंघाचे राज्य सचिव प्रा. बाळासाहेब माने ( मुंबई) , डॉ अंजना खताळ मुंबई, प्राचार्य, किशोरकुमार देशमुख, प्राचार्य अमृत मोहतुरे, प्राचार्य रमेश तरोणे, ज्येष्ठ प्रा. अंकुश तितीरमारे, प्रा. दिलीप करंबे, प्रा. छगन झंजाळ, महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे, प्रा. पवन कटरे, प्रा. यशवंत पवार, प्रा. ओमप्रकाश ढोरे, प्रा. दीपा ठाणेकर, प्रा. सुरेश नखाते, प्रा. सोनाली बावनकर, डॉ. शालिनी तेलरांधे यांनी भूषविले.
या तीन दिवशीय स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.वसुधा देवगडे, प्रा.विजया मने, प्रा. नामदेव मोरे, प्रा. कुंडलिक राठोड, डॉ. ज्योती दुफारे, प्रा.रंजना देशमुख, प्रा. विद्या कुमरे, प्रा. जागेश्वर भेंडारकर, डॉ. नीता वानखेडे, प्रा.मेघा राऊत, प्रा. सायली लाखे, प्रा.योगिता धांडे, डॉ. दिशा गेडाम यांनी काम पाहिले.
या तीन दिवसीय स्पर्धा कार्यक्रमांचे संपूर्ण आयोजन, नियोजन व संचालन प्रा. संजय लेनगुरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विनोद हटवार, प्रा. प्रांजली दरवळकर यांनी केले. तर मान्यवरांचे आभार प्रा. प्रियंका बोपचे, प्रा. ज्ञानेश्वरी रहांगडाले, कु. वंशिका सोनवाने यांनी मानले. कु. साक्षी वंजारी हिने, उत्कृष्ट असे स्वागत गीत गायले. शेवटी स्पर्धा कार्यक्रमाबद्दल कु. खुशी भोयर, कु. वर्षा जनबंधू कु. प्रणाली धाडसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील मराठी विषय शिक्षकांनी सहभाग नोंदविला.






