spot_img
spot_img
29.5 C
New York
Saturday, August 1, 2026

मार्गदर्शक प्रा. डॉ सुधीर मोते, जिल्हासंघटक प्रा.किशोर ढोक, तालुकाध्यक्ष प्रा.स्वाती गुंडावार

मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित

भद्रावती

मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी राज्याध्यक्ष प्रा. सुनील डिसले बारामती यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव प्रा. बाळासाहेब माने मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. या चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीत सल्लागार म्हणून जेष्ठ प्राध्यापक डॉ सुधीर मोते भद्रावती यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा संघटक म्हणून प्रा किशोर ढोक यांची निवड करण्यात आली तर भद्रावती तालुका अध्यक्ष म्हणून प्रा. स्वाती गुंडावार यांची निवड करण्यात आली.

मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर जिल्ह्याची आभासी पद्धतीने नुकतीच सभा घेण्यात आली. या सभेत राज्याचे अध्यक्ष सुनील डिसले, सचिव बाळासाहेब माने, कार्याध्यक्ष डॉ मनिषा रिठे, सल्लागार डॉ विजय हेलवटे हे प्रमुखांने उपस्थितीत होते. या सभेत राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी चंद्रपूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची कार्यकारिणी जाहीर केली.

या कार्यकारिणीत चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रा. गजानन सातपुते यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी प्रा. देविदास सालवटकर यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून डॉ. सुधीर मोते भद्रावती प्राचार्य धर्मराज काळे गडचांदूर, प्राचार्य संजय मरसकोले नवरगाव यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत
जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र विखार, बोथली, तसेच संजय मुंडे जिवती, सहसचिव प्रा. रेणुका देशकर राजूरा, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. देवेंद्र प्रधान नागभीड, जिल्हा संघटक प्रा. किशोर ढोक भद्रावती, जिल्हा सहसंघटक प्रा. शुभांगी मोहितकर चंद्रपूर, प्रसिद्धी प्रमुख प्रा. संतोष बांदुरकर, गोंडपिपरी यांची जिल्हा पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

या चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीत भद्रावती येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती चे जेष्ठ प्रा. डॉ सुधीर मोते यांची सल्लागार पदी निवड झाली. भद्रावती येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती चे प्रा. किशोर ढोक यांची जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. तसेच प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधींची निवड करण्यात आली. त्यात भद्रावती तालुका अध्यक्ष म्हणून लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या प्रा. स्वाती गुंडावार यांची निवड करण्यात आली. याप्रमाणे सर्वानुमते चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली. या सभेला राज्याध्यक्ष, सचिव, सल्लागार, उपाध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ सुधीर मोते, सावित्री बाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य धर्मराज काळे यांनीही मार्गदर्शन केले.

या सभेचे प्रास्ताविक प्रा. नामदेव मोरे अध्यक्ष यांनी केले. या आभासी सभेचे सुत्रसंचलन प्रा. संजय लेनगुरे राज्य कोषाध्यक्ष यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष बांदूरकर यांनी केले. या सभेला प्रा. डॉ राजेंद्र सोनवणे समन्वयक, प्रा. सुरेश नखाते नागपूर, प्रा. यश पवार यवतमाळ, डॉ ओमप्रकाश ढोरे अमरावती, प्रा. विजया मने गडचिरोली, प्रा. पवन कटरे गोंदिया आ‌दी राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!