भद्रावती
भद्रावती येथील यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय भंगाराम वार्ड, भद्रावती येथे महिला, बालिका संरक्षण या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच “सखी सावित्री समिती” गठित करण्यात आली.
महिला अत्याचार व कायदेविषयक उपाय योजना या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता दिपकांता लभाने मॅडम समुपदेशक पोलिस स्टेशन भद्रावती यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी व्यासपीठावर उज्वला परचाके , पुजा पंदरे महिला पोलिस अमलदार तथा सोयाम मेजर पोलिस हवलदार , प्राध्यापक डॉ सुधीर मोते, डॉ ज्ञानेश हटवार, राजू गैनवार, अंगणवाडी सेविका सौ. सुनिता चवरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सुधीर मोते यांनी उपस्थित पालक, विद्यार्थ्यांना संबोधित केले. तसेच आज घरोघरी उदभवत असलेल्या समस्यांना कसे आळा घालता येईल यावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या उज्वला परचाके महिला पोलिस यांनी आज घडत आसलेल्या अत्याचाराविरुध्द कसे संरक्षण करावे याची माहिती देऊन मातांच्या शंकांचे निरसन केले. आज समाजात होणाऱ्या अत्याचाराबद्दल मुलींना सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
विद्यार्थांना अत्याचाराला बळी न पडता निर्भिळपणे आपले शिक्षण पूर्ण करा व मोठे व्हा असे सांगितले. तसेच प्रमुख पाहुण्या दिपकांता लभाने समुपदेशक पोलिस स्टेशन भद्रावती यांनी होणाऱ्या अत्याचारावर माहिती देऊन कायद्यात असलेली तरतुदींचा व कलमांना परिचित व केले. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पपिया बिश्वास यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री मडावी सर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ तथा विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गणेश घोरूडे सर, श्री आत्राम सर व कु.चेतना राऊत मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.






