spot_img
spot_img
30.2 C
New York
Saturday, June 6, 2026

मराठी विषय शिक्षक महासंघाची भंडारा जिल्हा कार्यकारिणी घोषित

जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रा. प्रांजली दरवळकर तर सचिव पदी प्रा. प्रियंका बोपचे.

भंडारा

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ भंडारा जिल्हा कार्यकारिणी घोषित झालेली असून त्यात पवनी येथील प्रा. प्रांजली दरवळकर यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी तर एस.एन. मोर महाविद्यालय तुमसर येथील प्रा. प्रियंका सुरेंद्र बोपचे यांची जिल्हा सचिव पदी निवड झाली.

सन २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात जिल्हाकार्याध्यक्ष पदी, नगरपालिका उच्च माध्यमिक विद्यालय पवनी येथील प्रा. प्रांजली दरवळकर, उपाध्यक्षपदी, जी.प. महात्मा गांधी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लाखनी येथील प्रा. गीता प्रधान यांची निवड करण्यात आली, तसेच जिल्हा सल्लागार म्हणून प्रा. अंकुश तितीरमारे. प्रा. दिलीप करंबे यांना स्थान देण्यात आले. जिल्हा कोषाध्यक्षपदी, प्रा. प्रवीण वंजारी तर जिल्हा संघटक पदी प्रा. उत्तम बनवाडे यांची निवड करण्यात आली.

भंडारा तालुकाध्यक्ष प्रा. शुभांगी सरादे, सचिव प्रा. ज्योती अवचटे, भंडारा शहराध्यक्ष प्रा. सुषमा मस्के, मोहाडी तालुकाध्यक्ष प्रा. नरेंद्र गायधने, तुमसर तालुकाध्यक्ष प्रा. जितेंद्र टिचकुले, साकोली तालुकाध्यक्ष प्रा. केशव कापगते, लाखांदूर तालुका अध्यक्ष प्रा.मोरेश्वर कन्नाके आणि पवनी तालुकाध्यक्ष पदी प्रा. अनिल वैद्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुका सचिवांची निवड करण्यात आली.

या निवड सभेत मराठी भाषेचे संवर्धन करणे, मराठी भाषा विषय शिक्षकांच्या समस्या सोडविणे, अध्ययन आणि अध्यापनात येणाऱ्या अडचणीचे निरसन करणे, आणि महाराष्ट्रात मराठी भाषा विषय किमान १२ वी पर्यंत सर्व विद्या शाखेत अनिवार्य करण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे, ही मराठी महासंघाची भूमिका असेल असे प्रा. संजय लेनगुरे यांनी स्पष्ट केले. या निवड प्रक्रियेच्या आभासी सभेत मराठी महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनील डीसले, सचिव प्रा. बाळासाहेब माने, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार , प्रा. यशवंत पवार यवतमाळ, डॉ ओमप्रकाश ढोरे अमरावती, प्रा. प्रशांत कवर वाशीम, डॉ. सुधीर मोते चंद्रपूर डॉ. शालिनी तेलरांधे नागपूर, प्रा. यशवंत पवार यवतमाळ तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष प्रा. विनोद हटवार उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!