प्रा. पितांबर पीसे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर…
शैक्षणिक कार्यातील उत्कृष्ठ योगदानाबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथील प्राध्यापक पितांबर पिसे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला.
टॉप रँक मेकर्स लातूर या संघटने मार्फत महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी हा पुरस्कार चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयातील समाजशास्त्राचे प्राध्यापक पितांबर पिसे यांना शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. 15 सप्टेंबर ला लातूर येथे होणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्राध्यापक पितांबर पिसे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याने संताजी जगनाडे महाराज कल्याणकारी मंडळ चिमूर यांच्या तर्फे अभीनंदन करण्यात आले तसेच सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.






