spot_img
spot_img
25.1 C
New York
Saturday, June 6, 2026

शिंदे विद्यालयात मुलींच्या सुरक्षेसंबंधी आढावा …

भद्रावती

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे शालेय परिससरात मुलींच्या सुरक्षे संबंधित आढावा बैठक घेण्यात आली.

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे शाळेत मुलींना सुरक्षाव्यवस्था पुरविण्या संबंधी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव डॉ कार्तिक शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे माजी प्राचार्य महादेव बरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रातील घडत असलेल्या लांच्छनास्पद घटना लक्षात घेता, आपल्या शाळेत मुलींना कशी सुरक्षाव्यवस्था पुरविण्या येवू शकते या संदर्भात विचारविनीमय करण्यात आला.

शासनाने विविध परिपत्रक काढून शाळेतील मुलींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी व मुलींच्या सुरक्षे साठी सावित्री कमिटी शाळेत आवश्यक आहे. त्या सर्व आपल्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया आहेत. परंतु त्या अधिक प्रमाणात कार्यात्मक करून आठवड्यातून दोन दा त्याचा अहवाल प्राचार्य घेतील. मुलींच्या सुरक्षेसाठी पुन्हा समितीचे गठण करण्यात येणार आहे . तेव्हा सर्व शिक्षक, प्राध्यापकांनी मुलींच्या सुरक्षे संबंधी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन करण्यात आले.

सभेचे सूत्रसंचालन डॉ सुधीर मोते यांनी केले तर आभार प्रदर्शन धिरज ताजने यांनी केले. सभेला सर्व शिक्षक प्राध्यापकांनी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!