मराठी विषय शिक्षक महासंघ भंडाराचे आयोजन
भंडारा जिल्हा प्रतिनिधी, दि. ०१ सप्टेंबर
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ भंडाराच्या वतीने एक दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन, महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनील डिसले यांचे अध्यक्षतेखाली आणि महासंघाचे सचिव प्रा. बाळासाहेब माने, डॉ ज्ञानेश हटवार उपाध्यक्ष, डॉ. अंजली खताळ यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या व्याख्यानमालेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. सुधीर मोते यांनी विद्यार्थ्यांना ” शिक्षक दिन ” साजरा करताना “स्वयंशासन ” कार्यक्रम कशाप्रकारे उत्कृष्ट पार पाडायचे याबद्दल उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवायचे असेल तर, तुमच्या आतून प्रेरणा मिळाली पाहिजे असे काहीतरी कार्य करा. स्वयंशासन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अगोदर तुम्ही स्वयंशिस्त बना आणि त्यासाठी स्वयं सूचनांचे पालन करा. असे सांगितले.
तसेच उत्कृष्ट वक्तृत्व शैली या विषयावर बोलताना प्रा. मृगा पागे यांनी कोणत्याही स्पर्धा ह्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या असतात. त्यातच वक्तृत्व स्पर्धेत, वक्तृत्व ही एक कला आहे आणि ही कला साध्य करण्यासाठी आधी आपण त्याचे साधक झालो पाहिजे. तसेच जेव्हा आपण बोलतो त्याप्रमाणे कृती करायला पाहिजे तेव्हा आपले आचरण सुधारेल. असे उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
या ऑनलाईन व्याख्यानमाला कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून डॉ.शालिनी तेलरांधे, डॉ. विजय हेलवटे प्रा. पवन कटरे, प्रा. विजया मने प्रा. सुधाकर ठाकूर प्रा.यश पवार, प्रा.रेखा कटके, प्रा. मेघा राऊत प्रा. वैशाली काळे, प्रा.योगेश सनेर उपस्थित होते. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. तसेच त्यांचे शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन आणि प्रास्ताविक प्रा. संजय लेनगुरे यांनी तर आभार प्रा. प्रांजली दरवळकर यांनी केले स्वागत गीत कु. माधवी वाघमारे हिने गायले कु. प्रणाली धाडसे यांनी आभार मानले.






