भद्रावती:
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे शासन परिपत्रकानुसार “सखी सावित्री समिती” ची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी शाळेला भेट देऊन विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना शिक्षण विस्तार अधिकारी सौ. सिध्दमशेट्टीवार मॅडम यांनी या समितीचे महत्व व कार्य या विषयी उपस्थितांना माहिती दिली. विद्यार्थीनी व महिलांवर सद्यस्थितीत होणाऱ्या अत्याचाराविषयी माहिती दिली.
विद्यार्थीनींनी न घाबरता आपल्या पाल्याना तसेच शिक्षकवृंदांना घडलेल्या घटनेविषयी माहिती द्यावी. शाळेत लावलेल्या तक्रार पेटी मध्ये आपली तक्रार दाखल करावी , ही माहिती गोपनीय ठेवण्यात येते. साठीच ही समिती स्थापन करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्रा. सौ. उज्वला वानखेडे मॅडम, प्रा. दोडके मॅडम, प्रा. पोटदुखे मॅडम, शबाना सय्यद मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या. वरील मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला वर्ग ८ ते १२ वी च्या विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साहेबा परविन शेख हीने केले तर आभार प्रदर्शन कु. सुवानी पुनवटकर हीने मानले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






