भद्रावती : कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक अंतर्गत स्थानिक भद्रावती येथील डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयातील बि.ए. तृतीय वर्षाचा नुकताच निकाल जाहीर झाला. यामध्ये कु. कोमल विनोद ताजने आणि कु. निकिता विजय मंगाम या दोन विद्यार्थीनी सारखे गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या असून महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थामध्ये उत्साह निर्माण झाल्या बाबत डॉ. कार्तिक शिंदे सचिव भद्रावती शिक्षण संस्था यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थाचे अभिनंदन केले. सर्व विद्यार्थीनी प्रथम श्रेणीमध्ये प्राविण्य प्राप्त केल्याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक, प्रा. कपिल राऊत , प्रा. प्रज्ञा लांडे. प्रा. प्रीती कंदकट्टीवार, प्रा. नेहा मानकर तसेच महाविद्यालयातील शिक्षकेत्तर सीमा हवेलिकर, निर्मिती रामटेके यांनी सुद्धा विद्यार्थाचे अभिनंदन करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.






