स्व. निळकंठराव शिंदे जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन…
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती संस्थापक सचिव , माजी आमदार, स्वर्गीय निळकंठराव शिंदे साहेब यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै २०२४ ला गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित केला आहे.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक सचिव, माजी आमदार स्वर्गीय नीलकंठ राव शिंदे, यांचा जयंती समारोह आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्त ऊद्या दि १/७/२०२४ रोज सोमवार ला सकाळी ९ वाजता विद्यालय , कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातून सत्र २०२३_२०२४ या शैक्षणिक वर्षात गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या जयंती समारोहा प्रित्यर्थ महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, संस्थेच्या विश्वस्थ श्रीमती नीलिमाताई शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे ह्यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होत आहे.






