spot_img
spot_img
24.2 C
New York
Tuesday, August 4, 2026

राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर अपघाताची शृंखला सुरूच

वरोरा चिमूर महामार्गावर आणखी एक बळी


वरोरा चिमूर महामार्गावर शेगाव पासून तीन किलोमीटर अंतरावर भेंडाळाजवळ आज दुपारच्या सुमारास ट्रक व दुचाकीच्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला.
वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई हा मागील कित्येक वर्षापासून अर्धवट स्वरूपात रखडलेला आहे. या आधी एस. आर. के. कंपनीकडे या महामार्गाचे काम देण्यात आले होते. परंतु आठ वर्षे लोटूनही कंपनीने रस्त्याचे काम पूर्ण न केल्यामुळे शेगाव येथे तसेच परिसरात या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्या संदर्भात अनेक निवेदने देण्यात आली ज्यामध्ये रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेत गडकरी यांनी एस. आर. के. कंपनीला कामावरून निलंबित करून के.सी.सी. कंपनीला संबंधित रोडचे काम देण्यात आले. परंतु सदर कंपनी कडून सुद्धा रोडचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. ठिकठिकाणी पुलाचे व रोडचे काम अर्धवट परिस्थितीत आहे. ज्या ठिकाणी पुलाचे काम अर्धवट आहे अशा ठिकाणी व जिथे रस्ता संपतो अशा ठिकाणी कंपनी कडून सूचनाफलक लावणे अपेक्षित असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची सूचनाफलक किंवा रिबन बांधले गेलेले नसल्यामुळे यावर वारंवार अपघात होत आहे.
अशाच प्रकारचा एक अपघात मागील आठवड्यात बामणडोह जवळ कारला कारची मागून धडक दिल्यामुळे चंद्रपूर येथील काही डॉक्टर गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. या घटनेला आठवडा होतो ना होतो तोच आज भेंडाळ्याजवळ एका ट्रकवर दुचाकी आदळून दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ हा आणखी किती बडी घेणार व आणखी किती निरप्राण लोकांचा जीव गेल्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना तसेच प्रशासनाला जाग येईल हाच प्रश्न जनतेला पडलेला आहे?
या अपघातातील ट्रक जागेवरून पसार झाल्याने अज्ञात ट्रकने इसमाच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या अपघातातील दुचाकी क्रमांक एम एच ३४ बी डब्ल्यू १२५८ ही असून मृत इसमा सुस येथील पंकज बर्डे वय वर्षे २६ असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय शंकर सुरजुसे यांच्या मार्गदर्शनात मदन येरमे व हरिदास चोपणे करत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!