spot_img
spot_img
27.8 C
New York
Friday, July 31, 2026

सालोरी येथे कृषी दुतांचे झाले आगमन

भद्रावती, दि.18 : महारोगी सेवा समिती द्वारा संचालित, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सालोरी येथे शेतकऱ्यांचा मार्गदर्शनासाठी विद्यार्थीनी दाखल झाल्या. यावेळी गावाचे सरपंच प्रतिभा शेरकुरे, उपसरपंच गजानन देहारी व इतर ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी विद्यार्थीनींचे स्वागत केले.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, शेती करतांना येणाऱ्या अडचणी यावर योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस.पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ आर.वी.महाजन, कार्यक्रम समन्वयक आर.वी.तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांचा मार्गदर्शनासाठी आयोजित या कार्यक्रमामध्ये सालोरी येथे कृषी कन्या वैष्णवी कोरडे, तनया महल्ले, मिताली झाडे, पुनम लुचे, मिनल खिरटकर, रूचिता कुंभारे, निकिता लाहोरे यांचा समावेश होता. या सोबतच इतर ग्रामस्थांनी व शेतकरीही उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!