प्रेमात गुरफटलेला प्रेमी युगुलांचा पार पडला आदर्श गावात प्रेम विवाह
दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ
भद्रावती
दि. १८ जून
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने मांगलगाव येथील शुभम रमेश भुते वय 30 वर्ष व कवडसी तालुका भिवापूर जिल्हा नागपूर येथील क्षृतिका मारोती राणे वय 1८ वर्ष यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे दिनांक १७ जून सकाळला अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती.
महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासले व या विवाह ला उपस्थिती दर्शवण्यासाठी मुलांचे आई – भाऊ व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले होते व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश सुद्धा आलं व समोरिल जिवन सुरळीत चालत रहावं अशा शुभेच्छा मुलाच्या आई व भावा कडुन नवदांपत्यला देण्यात आल्या. व त्यांचा विवाह १७ जुन २०२४ सोमवार ला. सायंकाळी ६.४५ ला.विवाह विठ्ठल रुक्मिणी देवस्थान चंदनखेडा येथे गावातील पंचासमक्ष लावून देण्यात आला.
यावेळी मुलाची आई बेबी रमेश भुते, भाऊ चंद्रशेखर भुते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिर पठाण, सरपंच नयन जांभुळे, मांगलगाव चे सरपंच प्रफुल्ल कोलते, पुरुषोत्तम मुडेवार, प्रभाकर दोडके, लोकेश कोकुडे, भानुदास भोस्कर, धनराज टोंगे, नामदेव गारघाटे, अमोल काकडे, चंद्रशेखर भुते, भगवान बतकी, प्रकाश गारघाटे, बालाजी महागमकार, वासुदेव घाटे, प्रविण भरडे, राहुल कोसुरकर, देवानंद पांढरे, आशिष बारतिने, हरिलाल बाटबरर्वे, राजु मांदाळे, राजु रंदये, जगन सोनुले, संभाजी दडमल, तंटामुक्त समिती सदस्या छाया घुगरे, अमृता कोकुळे, शंकुतला चलपे, शांता हनवते, वर्षा पाचभाई, अर्चना भुते, शैला गारघाटे, नसरिन पठाण, छाया मांदाळे, भाग्यश्री सोनुले, वनिता नन्नावरे, दिवाकर गोहणे, आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते. आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही सुखदुखात एकमेकांना साथ देण्याची शपथ देण्यात आली.






