भद्रावती : येथील भांदक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील पोल क्रमांक ८५२बी/०३-०५ जवळ मृतक अनोळखी पुरुष दि.१२ जुनचे पहाटे १२:४५ वाजता एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीने मालगाडीचे समोर येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मालगाडीचे लोको पायलट यांनी समोरील रेल्वे स्टेशनला दिली. यावरून त्यांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी प्रेताचा पंचनामा करून उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तब्बल एक आठवडा लोटूनही त्या मृतक व्यक्तीची अद्यापही ओळख पटली नाही.

मृत व्यक्ती अंदाजे ३५ ते ४० वर्षाचा असून उंची ५ फूट, रंग गोरा, काळे केस, मजबूत बांधा, दाढी मिशी असलेला, चौकोनी चेहरा, अंगात काळा पँट, कळ्या व लाल आडव्या पट्ट्याचा टी शर्ट घातलेला आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीची ओळख पटल्यास सबंधित पोलिस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन तपासी अंमलदार राकेश महेशकर रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा यांनी केले आहे.






