spot_img
spot_img
30.2 C
New York
Saturday, June 6, 2026

मच्छिंद्र मछुवा सहकारी संस्थेला मिळणार हक्काची जागा

अखेर त्या विवादित जागेवरच मच्छी बाजारासाठी मंजुरी

भद्रावती : मागील अनेक दिवसापासून भद्रावती येथे मच्छी बाजाराचा प्रश्न पेटला होता. मच्छी विक्रीसाठी सध्याची असलेली जागा ही नेहमी विवादात राहिली होती. परंतु आता मच्छिंद्र मच्छुवा सहकारी संस्थेच्या मागणीला दुजोरा देत भद्रावती शहरातील मौजा चिचोर्डी सर्वे नंबर १४१ व १४२ ही जागा मच्छी बाजारासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे.

मच्छिंद्र मछुवा सह. संस्था ही १९५० पासून भद्रावती येथे अस्तित्वात आहे. मागील अनेक वर्षापासून संस्था मच्छी बाजारासाठी जागेची मागणी शासनाकडे करत होती. २०१६ पासून असलेले संस्थेचे अध्यक्ष आणि संस्था संचालक मंडळ यांनी सतत शासनाकडे जागेसाठी पाठपुरावा केला. अखेर संस्थेच्या प्रयत्नाला यश मिळाले आणि दिनांक २८ एप्रिल ला शिवरकर सोसायटी, शिंदे महाविद्यालय मागील मौजा चिचोर्डी सर्वे नंबर १४१ व १४२ या जागेची पाहणी नगराध्यक्ष भद्रावती, इंजिनियर आणि कर्मचारी यांनी केली. जागेची मोजणी करून आखणी करण्यात आली. आता शिवरकर सोसायटी येथील मच्छी बाजाराची जागा मच्छिंद्र मछुवा सहकारी संस्थेला मिळणार यावर शिक्कामोर्तब झाले.

यावेळी अनिल धानोरकर नगराध्यक्ष भद्रावती, प्रफुल चटकी, इंजिनीयर गुप्ता, संस्थाध्यक्ष रवींद्र नागपुरे, संचालक मंडळ अनंता मांढरे, सुनील पारशिवे, आकाश नागपुरे, अमोल नागपुरे, भोला नागपुरे, विनोद नागपुरे, योगेश नागपुरे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर नागपुरे, मयूर नागपुरे, मंगेश नागपुरे, महादेव नागपुरे, अनिल रुईकर, निळकंठ पारशिवे, संतोष मांढरे, उमा नागपूर आणि इतर भोई समाज बांधव उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!