भद्रावती : येथील बस स्थानकात सुलभ शौचालय कोरोना काळापासून बंदच आहे. भद्रावती हे तालुक्याचे ठिकाण आहे त्यामुळे आजुबाजूच्या गावातील नागरिक बसने प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी विविध कामाने, दवाखान्यात येत असतात. तसेच चंद्रपुर नागपूर हायवेवरील मुख शहर असल्यामुळे प्रत्येक बसचा थांबा येथे आहे. मात्र असे मोठे ठिकाण असुन सुद्धा बसस्थानकात साध मुत्रीघर सुद्धा उपलब्ध नाही.
भद्रावती शहरात आजुबाजूच्या सर्व गावातुन मुलेमुली शिक्षणासाठी येतात. मुलींना तसेत महिला वर्गांना कित्येक तास बसची वाट पहात राहावी लागते. महिलांसाठी पुर्ण बसस्थानकात कोठेही प्रसाधनगृहाची व्यवस्था केली नाही. त्यामुळे नागरिकांना, खास करून महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु महामंडळ याविषयी कोणतेही पाऊल उचलायला तयार नाही.

भद्रावती बसस्थानकातील सुलभ शौचालय हे नगरपालिकेने बांधुन दिलेले आहे. मात्र कोरोना काळापासून त्यालाही समस्येने वेडले आहे. शौचालयाची मुख्य पाईप लाईन फुटल्यामुळे बंद आहे. बसस्थानकातील सुलभ शौचालय दुरूस्त होईपर्यंत नागरिकांसाठी तात्पुरती मुत्रीघराची सोय करावी, जेणे करून नागरिकांना त्रास कमी होईल अशी मागणी भद्रावतीकर करत आहे.
भद्रावती बसस्थानकाची जागा ही ऑर्डनेंस फॅक्टरी चांदाच्या हद्दीत येत असल्यामुळे तिथे कोणतेही पक्के बांधकाम करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. परंतु नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारीमुळे बंद असलेल्या सुलभ शौचालयाला दुरूस्तीचे ऑर्डर देण्यात आले आहे. लवकरच सुलभ शौचालय दुरूस्त करून पुन्हा नागरिकांच्या सेवेत सुरू होईल. डॉ.विशाखा शेळकी, मुख्याधिकारी नगरपालिका, भद्रावती






