spot_img
spot_img
30.2 C
New York
Saturday, June 6, 2026

चंद्रपूर जिल्हा निवड सिनियर बुद्धिबळ स्पर्धा जे.बी.सायन्स कॉलेज मधे संपन्न

विद्यार्थ्यां करीता अनेक स्पर्धांचे आयोजन करताना आनंद होतो.- प्रा. नीरज आत्राम

वरोरा : आनंदवन ग्रामीण प्रतिनिधी आशिष कोटकर वरोरा:- क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर व नीरजा समूह महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा निवड सिनियर बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 30 एप्रिल 2023 ला जे. बी. सायन्स कॉलेज वरोरा येथे घेण्यात आली . स्पर्धेत स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा म्हणजे निवड स्पर्धा होती. सर्व खेळाडू मधून 4 स्पर्धकाची जळगाव येथे होणाऱ्या राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक अक्षय बागुलवार, द्वितीय आकाश पंदीलवार, तृतीय आशय मडावी तर चतुर्थ अभिजित आष्टकर यांनी पटकाविले. प्रथम व द्वितीय विजेत्यांना राज्य बुद्धिबळ स्पर्धा फी करीता प्रत्येकी हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटक प्रा. नीरज आत्राम यांनी सफेद मोहरा चालवून उद्घाटन केले. कार्यक्रमाचे आयोजन व मुख्य आरबीटर मा. नरेन्द्र कन्नाके सर व जगदीश वाघ सर यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पडली. कार्यक्रमाचे आयोजित करण्यास नरेंद्र कन्नाके (सहायक शिक्षक, नेहरू विद्यालय शेगाव बूज .), यांनी अथकपणे प्रयत्न केले. स्पर्धा यशस्वी झाल्या बद्दल प्राचार्य बन्सोड मॅडम यांनी व अध्यक्ष मा.आश्विन मुसळे सर या सर्वांनी अभिनंदन केलेले आहे.


spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!