- 🪷 सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन
चंद्रपूर
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य व चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सव-२०२३ ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, २४ व रविवार, २५ फेब्रुवारी रोजी स्थानिक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय येथे करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडेल. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. अशोक नेते, आ. रामदास आंबटकर, आ. अभिजीत वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. किर्तीकुमार भांगडिया, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, आ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन कोटेवार, किरण धांडोरे, रत्नाकर नलावडे आदींची यावेळी उपस्थिती राहील. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शल्यचिकित्सक व साहित्यिक डॉ. शरदचंद्र सालफळे राहतील.
जे
शनिवारी सकाळी ८ वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय परिसरातून ग्रंथपूजन व ग्रंथदिंडी निघेल. यावेळी विनय गौडा, विवेक जॉन्सन, मुमक्का सुदर्शन यांची उपस्थिती राहील. दुपारी ३ वाजता वाड्ःमय व अवांतर वाचनापासून मराठी वाचक का दुरावत आहे, या विषयावर परिसंवाद पार पडेल. अध्यक्षस्थानी डॉ. श्याम मोहरकर राहतील. तर, वक्ते म्हणून डॉ. धनराज खानोरकर, बंडोपंत बोढेकर, डॉ. राज मुसणे, डॉ. जयश्री शास्त्री, संजय रामगिरवार आदींची उपस्थिती राहील. संध्याकाळी ५ वाजता कथाकथन कार्यक्रम पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. विद्याधर बन्सोड राहतील. तर मंचावर संजय येरणे, मधुसूदन पुराणिक, वर्षा चौबे, गोपाल शिरपूरकर उपस्थित राहतील.
रविवार, २५ फेब्रुवारी रोजी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रम पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी संजय पवार राहतील. तर, वक्ते म्हणून रणजित यादव, श्याम वाखर्डे, डॉ. संजय भुत्तमवार आदींची उपस्थिती राहील. दुपारी १२ वाजता ‘शिवराज्यभिषेक सोहळा ः एक विहंगावलोकन’ या विषयावर परिसंवाद पार पडेल. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश शेंडे राहतील. तर, वक्ते म्हणून डॉ. योगेश दुधपचारे, डॉ. मिलिंद भगत, प्रा. श्याम हेडाऊ, प्रा. संजय उगेमुगे यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी ३ वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडेल. अध्यक्षस्थानी किशोर मुगल राहतील. यात डॉ. पद्मरेखा धनकर, प्रदीप देशमुख, अविनाश पोईनकर, धनंजय साळवे, डॉ. सुधीर मोते, प्रविण आडेकर, विजय वाटेकर, मालती सेमले, प्रा. आनंद भिमटे, लक्ष्मण खोब्रागडे, अरूण झगडकर, अमरदीप लोखंडे, प्रदीप हेमके, प्रा. तुलेश्वरी बालपांडे आदींची उपस्थिती राहणार आहे. वन






