spot_img
spot_img
28.3 C
New York
Tuesday, August 4, 2026

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात संपन्न …

🪷 “रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकारण्याची गरज” प्राचार्य डॉ जयंत वानखेड

भद्रावती

यशवंतराव शिंदे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून झाली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी प्रा. डॉ सुधीर मोते, प्रा. डॉ ज्ञानेश हटवार व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी “छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार कृतीत उतरवण्याची आज समाजाला आवश्यकता असल्याचे मार्गदर्शन केले”. तर डॉ. ज्ञानेश हटवार यांनी मार्गदर्शन करताना ” छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणकारी राज्याची स्थापना करत असताना सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेतले” असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राकेश आवारी यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रवी देऊरकर, अशोक पिदुरकर, कवडू पोलेवार यांनी परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!