🪷 यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे खाशाबा जाधव जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे खासाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे सर प्रमुख अतिथी डॉ कार्तिक शिंदे सचिव, डॉ विशाल शिंदे सहसचिव, डॉ सुधीर मोते उपस्थित होते. मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे सर यांनी खाशाबा जाधव यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व खेळाचे महत्व पटवून दिले. राज्य क्रीडा दिना निमित्त रस्सीखेच या खेळाचा प्रदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्राध्यापक रमेश चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर ढोक यांनी केले . कार्यक्रमाला माधव केंद्रे, राकेश आवारी, रवी देऊकर, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






