spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

भद्रावती तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील युवा, पुरुषांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात ईनकमिंग

भद्रावती : तालुक्यातील कोंढा, चालबर्डी, मांगली येथील असंख्य युवा, पुरूषांनी विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तथा तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या नेतृत्वात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात दि. १७ ला पक्षप्रवेश घेतला.शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख नेते आमदार भास्करजी जाधव यांचे मार्गदर्शनात, पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व विभागीय प्रवक्ता प्रा.सौ. शिल्पाताई बोडखे यांचे सुचनेनुसार व वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तथा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांचे मार्गदर्शनात तसेच तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांचे नेतृत्वात कोंढा, चालबर्डी, मांगली येथील असंख्य युवा, पुरूषांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्ष प्रवेश केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुखपदी रवींद्र शिंदे यांची नियुक्ती झाल्यापासुन शिवसेनेत नवचैतन्य संचारले आहे. ज्येष्ठ व युवा शिवसैनिकांना सोबत घेवून व कोणताही भेद न ठेवता पक्षावर निष्ठा असलेल्या सर्वांना सामावून घेवून त्यांचे कार्य करीत असल्याने सर्वांना पक्षात कार्य करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन असंख्य शिवसैनिक पक्षात पक्षप्रवेश घेतांना दिसत आहे. हिन्दुहदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी अंगीकृत केलेले ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या भूमिकेतून रविंद्र शिंदे या परिसरात शिवसेनेचे कार्य करीत आहे. पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक सतत जनतेच्या सेवेत असल्यामुळे जनतेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास वाढत आहे. त्याच अनुषंगाने दि. १७ रोज बुधवारला रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या पुढाकाराने चालबर्डी (कोंढा) येथील दिलीप कूरेकार, सुरेश चिकटे, अतुल मोरे, कोंढा येथील सुनिल काळे, विठोबा चामाटे, कोंढा नविन वस्ती येथील अशोक पिंपळकर, मांगली येथील बंडु ढेंगळे, भद्रावती येथील अशोक नेहारे, सुशांत देवगडे तसेच मनोहर वर्मा, मारोती निमकर, चंद्रभान टोंगे या युवा, पुरूषांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) भद्रावती तालुका कार्यालय “शिवनेरी” येथे शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला.

याप्रसंगी तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या सोबत शहर प्रमुख घनश्याम आस्वले, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर, गौरव नागपूर तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!