spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

स्व. जगन्नाथजी गावंडे स्मृती दिनानिमित्त स्वर्गरथ लोकार्पण सोहळा


भद्रावती : येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्वर्यू सेवाव्रती स्व.जगन्नाथजी गावंडे दादा यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त स्वर्गरथ,शवपेटी लोकार्पण सोहळा व सत्यपाल महाराजांचे जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७.०० वाजता हनुमान मंदिर देवस्थान सुरक्षा नगर येथील भव्य प्रांगणात करण्यात आले आहे.


दिनांक १९ जानेवारी ला सायंकाळी ६.०० वाजता सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात होईल तसेच सायंकाळी ठीक ७.०० वाजता स्वर्गरथ, शवपेटी लोकार्पण सोहळा व विविध सामाजिक संघटनांचा सत्कार समारंभ पार पडणार आहे व त्यानंतर लगेच सप्तखंजरी वादक राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल. तसेच दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी ५.३० वाजता सामुदायिक ध्यान त्यानंतर ग्रामस्वच्छता करून सेवावृत्ती स्व.जगन्नाथजी गावंडे दादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल व त्यानंतर राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप होईल. या सर्व कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमोल गावंडे विशाल गावंडे गुणवंत कुत्तरमारे व आयोजकांनी केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!