spot_img
spot_img
22.2 C
New York
Friday, July 31, 2026

21 तारखेला पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आनंदवनात होणार

कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूरचे आयोजन

🪷 विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार

भद्रावती: कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मराठी विषय शिक्षकांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आनंदवन वरोरा येथे दिनांक 21 जानेवारी 2024 ला आयोजित केले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या एक दिवसीय अधिवेशनात तीन सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. या अधिवेशनात राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक उपस्थित राहणार आहेत.


पहिला राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर श्याम मोहरकर ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक चंद्रपूर, प्रमुख अतिथी माननीय उल्हास नरड साहेब शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर, माननीय श्रीकांत पाटील वरोरा, मा. सुनील डिसले राज्याध्यक्ष, संपतराव गर्जे कार्याध्यक्ष, बाळासाहेब माने सचिव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषयी शिक्षक महासंघाच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या आहेत.

दुसऱ्या सत्रात शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या अभ्यासक्रमातील विविध घटकांवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे . डॉ माधुरी काळे वर्धा, सदस्य, अभ्यासक्रम मंडळ पुणे, डॉ शालिनी तेलरांधे नागपूर , डॉ विजय सोरते बल्लारशा, डॉ विठ्ठल चौथाले चामोर्शी, गडचिरोली, डॉ सुधीर रायपुरकर नागपूर , मा. भगवान शोभणे भंडारा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तिसऱ्या सत्रात प्राचार्य धर्मराज काळे गडचांदूर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ . ज्ञानेश हटवार प्रतिनिधी चंद्रपूर, डॉ सुधीर मोते जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत खुले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
यानंतर आनंदवन चा स्वरानंद आर्केस्ट्रा हा मनोरंजनाचा कार्यक्रम तसेच आनंदवन भ्रमंती चे आयोजन केले आहे.

या विविध सत्रात चालणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन सुनील डीसले राज्याअध्यक्ष, बाळासाहेब माने सचिव , संपतराव गर्जे कार्याध्यक्ष, डॉ ज्ञानेश हटवार जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर , डॉ सुधीर मोते जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, विजया मने गडचिरोली, संजय लेनगुरे भंडारा, पवन कटरे गोंदिया, यशवंत पवार यवतमाळ, सुरेश नखाते नागपूर, राजेश डंभारे वर्धा, संजय राठोड अमरावती, रोहीदास चव्हाण वाशिम, गणेश शिंदे बुलढाणा, विशाल गावंडे अकोला, डॉ राजेंद्र सोनवणे जालना तसेच समस्त राज्य कार्यकारिणी तसेच चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाने केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!