भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक शाळा चिचोर्डी मध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शाळेतील मुलींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारून त्यांचा शिक्षण प्रसाराचा प्रवास सर्वांसमोर सादर केला. कु पावणी पारसे व कु नंदिनी ठाकूर यांनी शिक्षणावर आधारित नाटिका सादर करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रवीण शिंदे सर यांनी प्रत्येक स्त्रीने घराबाहेर पडून समाजात स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करावी याबद्दल मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी कवाडे मॅडम(विषयतज्ञ बी आर सी ) यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून आयुष्यात नेहमी पुढे जा असा संदेश आपल्या मनोगतातून दिला.प्रमुख पाहुण्या सौ कार्लेकर मॅडम यांनी आपल्या गीतातून सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण प्रसाराचे योगदान व्यक्त केले. प्रमुख अतिथी सौ कोकाडे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवासाचा परिचय करुन दिला. श्री योगेश बोढे सर यांनी मा. मुख्यमंत्री साहेब यांच्या संदेशाचे विद्यार्थ्यांकडून वाचन करवून घेतले. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनी पावणी पारसे, दुर्गा देरकर, अनन्या पिंपळकर, गौरी सोनूले,साक्षी शर्मा,संस्कृती नागपुरे यांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कु नंदिनी ठाकूर हिने केले तर आभार प्रदर्शन कु तेजल भडके हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले






